कराची : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ निष्पाप भारतीयांची चिता अजूनही शांत झालेली नाही. दरम्यान, सिंधू पाणी करार मोडण्यासह भारताच्या ५ निर्णयांमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीकडे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते पण त्याला या दहशतवादी हल्ल्याचा पुरावा नक्कीच हवा होता. भारत कोणत्याही पुराव्यांशिवाय पाकिस्तानवर आरोप करत असल्याचा दावा आफ्रिदीने केला. आफ्रिदी म्हणाला की, भारताने पाकिस्तानवर लावलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत.भारताचा हा दृष्टिकोन दुर्दैवी असल्याचे आफ्रिदी म्हणाला. दोन्ही देशांमधील संवादाला चालना देण्याबद्दल तो बोलला. त्याचा असा विश्वास आहे की केवळ संवादाद्वारेच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव कमी होऊ शकतो. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानशी अनेक संबंध तोडले आहेत. आफ्रिदीने काश्मीरमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल विचित्र पद्धतीने दुःख व्यक्त केले. दोन्ही देशांनी चर्चा करावी, असे आफ्रिदी म्हणाला. त्याच्या मते, आपल्या समस्यांवर संवाद हाच एकमेव उपाय आहे; लढून काही फायदा नाही. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. भारताने पाकिस्तानसोबतचा पाणीवाटप करार रद्द केला आहे
Fans
Followers